User talk:Dr.sachin23

From Wikisource
Jump to navigation Jump to search

Hello Dr.sachin23, welcome to the multilingual Wikisource! Thanks for your interest in the project; we hope you'll enjoy the community and your work here.

This wiki is the original Wikisource wiki, originally hosting works in many languages. The larger collections have been spawned into separate projects, leaving this wiki to serve as a central collaboration point, and as an environment where works without a language subdomain can be started. Refer to our languages list to see which languages still reside on this wiki. You can find a list of the separate language projects on the main page or here and you may want to look at the our coordination page for limitations on placing certain works on the separate language projects.

Most questions and discussions about the community are in the Scriptorium.

The Community Portal lists tasks you can help with if you wish. If you have any questions, feel free to contact me on my talk page!

--Ooswesthoesbes 15:56, 26 February 2011 (UTC)[reply]

साथी हाथ बढाना..[edit]

नमस्कार सचिन, मी वाटंच पाहत होतो कुणीतरी मराठी विकिस्त्रोतावर काम करायला सोबत असावं म्हणून. बहिणाबाई चौधरींबद्दल तुमचं योगदान पाहून आनंद झाला. तुमच्याकडे त्यांपैकी एखादं पुस्तक असेल तर आपण तो प्रकल्प पुढे सुरू ठेऊ शकतो. माझ्याकडे सध्या समग्र बालकवी आणि गोविंदाग्रजांचा वाग्वैजयंती या काव्यसंग्रह आहे. महात्मा फुले समग्र वाङ्मय आहे. त्या जोरावर मी आपलं थोडंबहुत योगदान सुरू केलं आहे. स्कॅन करायची सोय माझ्याकडे नाही, त्यामुळे पुस्तक स्कॅन करणं मला जमत नाहीये, पण जमेल तितकं टाईप तर मी करतोच आहे. तुमचं अगदी header, categories, आणि PD-India युक्त योगदान पाहून खरंच आनंद झाला. आधीपासून टापटीप असलेलं बरं, नंतर साफसफाई करायला खूप वेळ आणि मनुष्यबळ वाया जातं. Ganesh Dhamodkar (Talk) 16:05, 3 January 2012 (UTC)[reply]

आपण सार्वजनिक संगणक वापरत असाल तर माझ्या माहितीत तरी इथे देवनागरी लिहिता येत नाही. वैयक्तिक संगणक असेल तर अनेक मार्ग आहेत? कळवा, म्हणजे कळवतो? किंवा ऑनलाईन असाल तर गुगल टॉकवर ganesh.dhamodkar at gmail dot com इथे मी सध्या ऑनलाईन आहे! Ganesh Dhamodkar (Talk) 16:20, 12 January 2012 (UTC)[reply]
[PramukhIME हा एक छोटासा Free प्रोग्राम आहे ज्याच्या मदतीने आपण कुठेही भारतीय भाषांमध्ये लिहू शकता, अगदी कुठेही, कुठल्याही साईटवर, Firefox असो की Internet explorer, किंवा notepad, wordpad, MS Word, किंवा काहीही! मी हाच प्रोग्राम वापरतो, ऑनलाईन असो की ऑफलाईन, सर्वोत्तम! Ganesh Dhamodkar (Talk) 16:29, 12 January 2012 (UTC)[reply]

शेतकर्‍याचा असूड[edit]

सचीन, शेतकर्‍याचा असूडास सुरूवात केल्याबद्दल धन्यवाद! माझ्या मते या पुस्तकाचे (व सर्वच पुस्तकांचे) लिखाण आपण पान क्रमांकानुसार न करता प्रकरणांनुसार केले तर ते पुढच्या दृष्टीकोनातून बरे होईल. या पुस्तकात महात्मा फुले यांनी एकुण पाच प्रकरणे व शेवटी दोन अधिकची प्रकरणे जोडली आहेत, त्याप्रमाणे लिखाण केले तर कसे होईल? म्हणजे पान क्रमांक वेगवेगळ्या आवृत्त्यांनुसार भिन्न भिन्न असू शकतात. प्रकरणे मात्र तीच असतील. इंग्रजी पुस्तकांच्या बाबती असे पानानुसार लेख सापडतात, पण त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे इंग्रजी भाषेसाठी यांत्रिक OCR ची व्यवस्था असते. ते सॉफ्टवेयर पानांवरील माहिती आपोपाप टाईप करते जी मग नंतर एकत्र जोडता येते. आपल्याकडे तशी व्यवस्था नाही. आणखी ज्या कुणाला पुढे हे पुस्तक pdf मध्ये डाऊनलोड करवून घ्यावयाचे असेल त्यांना एकेक पान डाऊनलोड करावे लागणार नाही. आपले मत कळवावे, त्यानुसार करू! Ganesh Dhamodkar (Talk) 16:53, 12 January 2012 (UTC)[reply]

साने गुरुजी समग्र साहित्य[edit]

सचीन, साने गुरुजी समग्र साहित्य http://saneguruji.net येथे उपलब्ध आहे. ते तिथून कॉपी-पेस्ट करता येईल. तुम्हाला हे काम करता येईल का? कॉपीराईटसंबंधी विचार करण्याची गरज नाही, सानेगुरूजी साहित्य public domain आहे. राम गणेश गडकरी साहित्यही असेच उपलब्ध आहे. Ganesh Dhamodkar (Talk) 05:19, 23 January 2012 (UTC)[reply]

Dear Friend, May be you are already aware , beginning of February 2012 month the Language Committee and WMF approved new wikisource projects http://mr.wikisource.org which is independent project for Marathi Language.This has been possible with your active contribution , support and best wishes towards Marathi language Wikisource project and we are very much thankful to you for the same.

The new Marathi Wikisource community invites you and requests for same support to http://mr.wikisource.org in times to come.

नमस्कार, आपणास कदाचित कल्पना असेल कि फेब्रुवारी २०१२ च्या सुरवातीस लँग्वेज कमिटी आणि विकिमिडिया फाऊंडेशननने मराठी भाषेकरिता स्वतंत्र http://mr.wikisource.org विकिप्रकल्पास मान्यता दिली आहे. हे केवळ आपल्या शुभेच्छा, सक्रीय योगदान आणि पाठींब्याने शक्य झाले आहे; आणि आपल्या योगदाना बद्दल समस्त मराठी बांधवांतर्फे धन्यवाद.

आपण आपले सक्रीय सहभाग, कार्य, पाठबळ http://mr.wikisource.org या प्रक्ल्पास देऊन मराठी भाषिकांचे हे मुक्त ग्रंथालय सर्व अंगाने समृद्ध करत रहावे म्हणून हे सादर निमंत्रण आणि नम्र विनंती.

आपण कॉमन विकिस्रोत प्रकल्पात,मराठी विकिबुक्स अथवा मराठी विकिपीडीया प्रकल्पात प्रताधिकारमुक्त साहित्याचे केलेले लेखन नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पात व्यवस्थीत स्थानांतरीत झाले आहे का हे तपासण्यात कृपया सहाय्य करावे.

आपला नम्र

Mahitgar 06:59, 14 February 2012 (UTC)[reply]