ज्ञानेश्वरी

From Wikisource

Jump to: navigation, search

[edit] अध्याय १८

जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ- । प्रभंजन ॥ १ ॥

जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥ २ ॥

जयजय देव सकळ । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ॥ ३ ॥


जयजय देव निश्चळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ॥ ४ ॥


जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ॥ ५ ॥


जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल- । केलिप्रिय ॥ ६ ॥


जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदममदनमदभेद । दयार्णव ॥ ७ ॥


जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तापापह ॥ ८ ॥


जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ॥ ९ ॥

जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्रुमबीजप्ररो- । हणावनी ॥ १० ॥


हें काय एकैक ऐसैसें । नानापरीभाषावशें । स्तोत्र करूं तुजोद्देशें । निर्विशेषा ॥ ११ ॥

जिहीं विशेषणीं विशेषिजे । तें दृश्य नव्हे रूप तुझें । हें जाणें मी म्हणोनि लाजें । वानणा इहीं ॥ १२ ॥


परी मर्यादेचा सागरु । हा तंवचि तया डगरु । जंव न देखे सुधाकरु । उदया आला ॥ १३ ॥


सोमकांतु निजनिर्झरीं । चंद्रा अर्घ्यादिक न करी । तें तोचि अवधारीं । करवी कीं जी ॥ १४ ॥


नेणों कैसी वसंतसंगें । अवचितिया वृक्षाचीं अंगें । फुटती तैं तयांहि जोगें । धरणें नोहे ॥ १५ ॥


पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजें कवण । कां जळें शिवतलें लवण । आंग भुले ॥ १६ ॥


तैसा तूंतें जेथ मी स्मरें । तेथ मीपण मी विसरें । मग जाकळिला ढेंकरें । तृप्तु जैसा ॥ १७ ॥


मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण धाडूनि देशें । स्तुतिमिषें पांचपिसें । बांधलें वाचे ॥ १८ ॥


ना येऱ्हवीं तरी आठवीं । राहोनि स्तुति जैं करावी । तैं गुणागुणिया धरावी । सरोभरी कीं ॥ १९ ॥


तरी तूं जी एकरसाचें लिंग । केवीं करूं गुणागुणीं विभाग । मोतीं फोडोनि सांधितां चांग । कीं तैसेंचि भलें ॥ २० ॥

Incomplete...

Personal tools